crime news
crime news

तपासासाठी आलेल्या कर्नाटकाच्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण; तीस जणांविरूद्ध गुन्हा

Published on

उमरगा (उस्मानाबाद): आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील बसवकल्याण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणासह २५ ते ३० जणाविरुद्ध सोमवारी ( ता. एक ) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, बसवकल्याणचे गुरुलिंगाप्पा मलप्पा पाटील हे पथकासह मारहाण व अॅट्रॉसीटीच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष पॉपकॉर्न याचा शोध घेण्यासाठी २८ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास कराळी शिवारातील शेतात कारने आले होते, या वेळी किरण पवार, मेजर, इब्राहीम, रफीक, बाळू यासह अन्य पंचवीस ते तीस लोकांनी त्यांना घेरुन  " तुम कर्नाटक पोलीस महाराष्ट्र मे आनेका हिंमत कैसे किया. " अशी धमकी देऊन काठी, दगड, कंबर पट्ट्यांनी पोलीसांना मारहाण केली.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गुरुलिंगाप्पा पाटील यांनी दिलेल्या प्रथम माहितीवरून गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान हे प्रकरण नेमके काय होते, घटनास्थळी नेमके काय चालु होते. अचानक कर्नाटक पोलिसांना  झालेल्या मारहाणीचे नेमके कारण कोणते याबाबतची चर्चा सुरू होत असून या प्रकरणात इतर २५ ते ३० जण कोण होते याचा पोलिस शोध घेत आहेत. विशेषतः या बाबतीत त्यावेळी काय घडले याची माहिती स्थानिक पोलिसांना होती का ?असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com