
बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच भरली जातील. इतर गट ‘क’ व ‘ड’ संवर्गाची पदेही भरली जातील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.