esakal | कळमनुरी तालुक्यात १२ हजार नागरिकांचे लसीकरण; काही ठिकाणी तुटवडा

बोलून बातमी शोधा

कळमनुरी लसीकरण केंद्र
कळमनुरी तालुक्यात १२ हजार नागरिकांचे लसीकरण; काही ठिकाणी तुटवडा
sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : आजाराचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याकरिता मागील काही दिवसात प्राधान्य दिल्यानंतर तालुक्यातील सात लसीकरण केंद्रावरुन 12 हजार 52 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. 30) ला लसीचा तुटवडा झाल्यामुळे सहा केंद्रावरील लसीकरण बंद पडले. तर केवळ रामेश्वर तांडा येथील लसीकरण केंद्रावर मोजके डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

आजाराचा संसर्ग वाढल्यानंतर नागरिकांना आता लसीकरणाचे महत्व समजून आले आहे त्यामुळे मागील काही दिवसात नागरिकांनी आपले लसीकरण करून घेण्याकरिता लसीकरण केंद्रावर रांगा लावून उपस्थिती लावली आहे मात्र लसीकरण केंद्रांना होणारा लसीचा पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्यामुळे लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र पोतरा, वाकोडी, मसोड, बाळापुर, डोंगरकडा, रामेश्वर तांडा, या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत येथील केंद्रांना कोविशील्ड च्या दहा हजार 69 तर कोवॅक्सिन एक हजार 983 लस उपलब्ध झाल्या होत्या त्यापैकी त्यापैकी 12 हजार 52 नागरिकांना लसीकरण करण्यात आले शुक्रवार (ता. 30) ला तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील लसीकरण केंद्र वगळता इतर सहा लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद होते, तर रामेश्वर तांडा येथील केंद्रावर कोविशिल्ड च्या मोजक्या लस उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - नांदेड : निवघा ग्रामपंचायतने रोखला बालविवाह

उर्वरित सहा लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद पडले आहे दरम्यान गुरुवार (ता. 29) ला येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असलेल्या लसीकरण केंद्रासाठी केवळ पन्नास लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र नागरिकांची मोठी संख्या पाहता बहुतांश नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. त्या मधूनही काही नागरिक कर्मचाऱ्यांनी यामधून मार्ग काढीत जवळच असलेल्या मसोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपला दुसरा डोस घेतला आहे.

एकंदरीत आजाराचा वाढता संसर्ग पाहता लसीकरण करून घेण्याकरिता सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांनी आता लसीकरण केंद्रावर लस घेण्याकरिता मोठी उपस्थिती दाखवली आहे. दुसऱ्या बाजूला लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. या स्थितीत लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकाकडून लस केव्हा उपलब्ध होणार याबाबत आता संबंधितांकडे विचारणा होऊ लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे