

Jalna Road News
esakal
वडीगोद्री: वडीगोद्री-अंतरवाली सराटी-भांबेरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष केल्याने प्रवासी व वाहनधारक मात्र त्रस्त झाले आहेत.
डागडुजीच्या नावावर खर्च होत असून, दुरुस्ती मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण कधी होणार, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. नागरिकांतून याबाबत संताप व्यक्त होत आहे.