वडवणी: तालुक्यात शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार वादळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. .काढणीला आलेला गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, टरबूज आणि खरबूज ही पिके मातीत मिसळल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे..Beed News: पावसात वीज वाहिन्या कोसळल्या; ‘महावितरण’च्या वादळाने जनतेला बसतोय करंट.गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी व मजुरांची मोठी धांदल उडाली.वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. विशेषतः आंबा बागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून कैऱ्यांचा खच जमिनीवर साचला आहे..काबाडकष्ट करून पिकवलेली पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे..Premium|Oracle Layoffs : एका ईमेलने संपली नोकरी: AI युगात IT इंजिनिअरचे भविष्य."आमच्या शेतात गहू व बाजरीची काढणी सुरू होती, मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतात पाणी साचून पिके पूर्णतः खराब झाली. आता उत्पादनाचा खर्च निघणेही कठीण झाले आहे."- विजय मोरे, शेतकरी, लोणवळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.