esakal | Parbhani Rain: वालूर परिसरात मुसळधार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

वालूर

जोमात आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने ऐन आनंदाच्या पोळ्याच्या सणावर विरजण पडले

Parbhani Rain: वालूर परिसरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर (परभणी): वालूर व परिसरात सोमवारी (ता.६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पिकांत पाणीच पाणी साचले. यामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन आनंदाचा पोळा सण साजरा करण्यात मग्न असलेल्या शेतकऱ्याची चिंता आता वाढली आहे. वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलांना सोमवारी पोळ्याच्या सणानिमत्त शेतकरी आपाआपल्या शेतात सजवण्याची तयारी करीत होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हजेरी लावली. यामुळे शेतातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जवळपास दोन तास धो-धो पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणीच पाणी साचले. जोमात आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने ऐन आनंदाच्या पोळ्याच्या सणावर विरजण पडले.

परिसरात खरिपाची कापूस, सोयाबीन, तुर आदी पिके जोमदार आली आहेत. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे व सोमवारी दुपारी परिसरात मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास दोन तास धो-धो पाऊस झाल्याने शेत शिवारातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांना काही काळ ताटकळत राहावे लागले.

loading image
go to top