
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांचा विरोध असतानाही वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे आता २६ ऑगस्टपासून नांदेड येथून धावणार आहे. छत्रपती संभाजीनगरकरांसाठी हक्काची असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस यापूर्वीच हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर आता संभाजीनगरकरांसाठी मुंबईला जाण्यासाठी सोयीची असलेली एकमेव वंदे भारत एक्स्प्रेस उरली होती. सकाळी सहा वाजता संभाजीनगर स्टेशनहून निघाल्यानंतर दुपारी १२ वाजता ती मुंबईत पोचत होती.