चक्क बैलगाडीतून आलं वऱ्हाड;जुन्या आठवणींना उजाळा

आधुनिक युगात वऱ्हाड चक्क बैलगाडीतून आल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
अव्वलगाव बुद्रुक ता. घनसावंगी येथे बैलगाडीने वऱ्हाड आणण्यात आले.
अव्वलगाव बुद्रुक ता. घनसावंगी येथे बैलगाडीने वऱ्हाड आणण्यात आले.sakal
Updated on

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील अव्वलगांव बुद्रुक येथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला असून या आधुनिक युगात वऱ्हाड चक्क बैलगाडीतून आल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.अव्वलगांव बुद्रुक येथे नुकताच १५ एप्रिल २०२२ रोजी अंकुशराव पवार यांचे चिरंजीव नागनाथ पवार व कचरू निचळ यांची कन्या वर्षा निचळ यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा म्हटले की प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी आलिशान गाड्या तर कुणी हेलिकॉप्टरचा उपयोग करतात.

माहिती व तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात विवाह सोहळा परंतु वाढत्या महागाईमुळे विवाह सोहळा म्हटले की जंगी पार पाडण्यासाठी गरीबांना विविध थाटमाट, आलिशान | गाड्या तसेच डीजेच्या गाण्यावर नृत्य असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. लग्न समारंभासाठी वाहनाचा खर्च करणे व यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अव्वलगांव बुद्रुक येथील अंकुशराव पवार यांनी आपल्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

यांमध्ये वधूचे घर गावात तर वराचे घर शेतात आहे. त्यामुळे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विवाह सोहळ्यासाठी नवरदेवाचे वडील अंकुशराव पवार यांनी चक्क बैलगाडीतून वऱ्हाड आणल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. बैलगाडीतून वहऱ्हाड आल्याने अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com