टमरेलबहाद्दर
टमरेलबहाद्दर

अंधारात पडताहेत टमरेलबहाद्दर बाहेर... 

जालना - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची कागदोपत्री घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, हजारो जणांकडे स्वच्छतागृहच नाही. परिणामी अनेक ठिकाणी अंधारातच टमरेलबहाद्दर घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, अशा कुटुंबांना स्वच्छतागृह देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सरपंचांनी पुढाकार घेण्यास कळविले आहे. 

वर्ष 2014 मध्ये सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मराठवाड्यातील जालना हा पहिला जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा ऑक्‍टोबर 2017 मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केली होती. मात्र, त्यानंतर दुष्काळाचा फटका बसला, पाणीप्रश्‍न निर्माण झाला. त्याचा परिणामही स्वच्छतागृहांचे वापर बंद झाले, अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचे बांधकाम रखडले, अनेकांचे बांधकामही थांबले. परिणामी आजघडीला जिल्हाभरात तब्बल सोळा हजार कुटुंबांकडे स्वच्छतागृह नसल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देऊन त्यांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी सध्याही प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात 45 हजारांहून अधिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. पाणंदमुक्तीच्या घोषणेनंतर पुन्हा ग्रामविकास विभागाने स्वच्छतागृह नसलेल्या गावांतील कुटुंबांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा कुटुंबांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी सरपंचांना पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 779 ग्रामपंचायतींच्या सरपंचांना स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांना ते बांधण्यासाठी पुढाकार घेण्याचे पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्रामसेवकांच्या मदतीने पंचायत समिती कार्यालयात स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. 

वर्षअखेरपर्यंत उद्दिष्ट 
शासनाने केलेल्या बेसलाइन सर्वेक्षणातील कुटुंबांना स्वच्छतागृह बांधून देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट नसलेल्या कुटुंबांना डिसेंबर 2019 अखेर स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहे. 

तालुकानिहाय स्वच्छतागृह बांधकाम उद्दिष्ट 
तालुका  स्वच्छतागृह उद्दिष्ट 
जालना  3858
बदनापूर  1068 
जाफराबाद  2039 
परतूर 1474 
घनसावंगी 832 
भोकरदन 3872
मंठा 3179 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com