शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मुल्य रुजविणारा उपक्रम

melava.1
melava.1

परभणी ः जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुल्यवर्धनाचा जागर सुरु झाला आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक म्हणून विविध या जागरातून विविध मुल्य रुजवली जाणार आहे. शुक्रवारी (ता.१७) आयोजित मुल्यवर्धन मेळाव्याच्या निमित्ताने प्रभार फेरी, चित्र प्रदर्शन, मार्गदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


जिल्हा मुल्यवर्धन मेळाव्याला शुक्रवारी (ता.)१७ प्रभात फेरीने सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वसमत रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसतीगृहाजवळी चित्र प्रदर्शनीत फेरीचा समारोप झाला. या वेळी चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते झाले. फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी, उपमहापौर भगवान वाघमारे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते झाले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
या वेळी शांतीलाल फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथा, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, हेमंतराव जामकर, विजय जामकर, सचिन देशमुख अॅड. अशोक सोनी डॉ. विवेक नावंदर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलतांना शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर म्हणाल्या, अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण महत्वाचे असून जिल्हा परिषद शाळांमधील मुल्यवर्धनाचे परिणाम दिसू लागले आहेत.

शिक्षक, पालक, प्रेरक यांच्याशी संवाद
आमदार श्री.वरपुडकर, आमदार डॉ. पाटील यांनी या वेळी विचार मांडले. विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक घडविण्यासाठी मुल्यवर्धन गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी व पालक यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रवीण वायकोस, रवी नायक यांनी केले तर झुंबरलाल मुथा यांनी आभार मानले. या वेळी श्री. मुथा यांनी शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक, शिक्षक, पालक, प्रेरक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अनेकांच्या मनात उदभवलेल्या प्रश्नांचे निरसन केले व मुल्यवर्धन म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली.

बंधुभाव व समानतेसाठी मुल्यवर्धन - सीईओ पृथ्वीराज
शिवाजी महाविद्यालयात आयोजित जिल्हा मुल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी नैतिकता जपणारा महत्त्वाचा धागा आहे. विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव आणि समानता नांदण्यासाठी मूल्यवर्धनाची सातत्याने गरज आहे. तेव्हाच समाजामध्ये खऱ्या अर्थाने बंधुभाव, समानता निर्माण होईल. देशभरात सारखे निर्भया प्रकरणासारखे अनेक वाईट प्रकार घडतात. अशावेळी विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव आणि समानता नांदण्यासाठी मूल्यवर्धन आवश्यक आहे. मूल्य स्वतःमध्ये रुजवणे व ते नेहमी जपणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने मूल्यवर्धित करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे.

येथील विद्यार्थी सहभागी
जिल्हा मुल्यवर्धन मेळाव्यानिमित्त प्रभात फेरीत महापालिका, जिल्हा परिषदेच्या मराठी, उर्दु शाळेचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते. भारतीय बाल विद्या मंदिरच्या लेझिम पथकाने या वेळी लक्ष वेधले. फेरीला शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.

चित्र प्रदर्शनाचे आयोजन
वसमत रस्त्यावर सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह परिसरात जिल्हा मुल्यवर्धन मेळाव्यानिमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शन रविवार (ता.१९) पर्यंत खुले आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com