

Shocking Arson Incident at Windmill Project Site
Sakal
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारात पवनचक्की उभारणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक घुसखोरी करुन पवनचक्की कंपनीच्या वाहनांना आग लावल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. २९ डिसेंबर) रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली या आगीत क्रेनसह इतर अवजड वाहने आणि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.