
वसमत : तीर्थक्षेत्र विकासासाठी ९ कोटी ८ लाखांचा निधी
वसमत : विधानसभा मतदार संघात ९ कोटी ८० लाख रुपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे.या विकास निधीमध्ये खोडकेश्वर महादेव मंदिर (सोमठाणा) येथे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक व विद्युतीकरण करणे, महादेव मंदिर (माळवटा) येथे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरण करणे, उत्तरेश्वर महादेव मंदिर (थोरावा) येथे मंदिर परिसरात मंगल कार्यालय सभागृह, यात्री निवास, संरक्षण भिंत, गार्डन व सुशोभीकरण करणे, बालाजी मंदिर (शिवपुरी)
येथे राज्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवून मंदिर परिसरात पथदिवे बसविले जाणार आहेत. तसेच बेलमंडल महादेव मंदिर (उंडेगाव, ता.औंढा नागनाथ) येथे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक व सभामंडप (टिनशेड) बांधकाम करणे, निळकंठेश्वर महादेव मंदिर (सेंदुरसेना, ता.औंढा ना.) येथे मंदिर परिसरात उभखांबी सभागृह, पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण, संरक्षण भिंत बांधकाम करणे आदींचा समावेश आहे. यात पर्यटन विकास निधी अंतर्गत ५ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, वसमत शहर नगर विकासासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अदितीताई तटकरे यांचे आमदार नवघरे यांनी आभार मानलेआहेत.
Web Title: Vasmat Pilgrimage Development Fund 9 Crore 8 Lakhs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..