Beed News: हायटेक इमारतीचे हाल; बाजार रस्त्यावर; रस्त्यावरील अतिक्रमणाने रस्ते झाले अरुंद; प्रशासकीय नाकर्तेपणामुळे बेवारस

Citizens’ Complaints and Health Concerns: बीडच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील वातानुकूलित भाजी मंडई राबवण्यात आली, पण भाजी विक्रेत्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: एका बाजूला शासकीय तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली चकाचक, वातानुकूलित आणि सर्व सोयींनी युक्त अशी भाजी मंडईची सुसज्ज इमारत उभी आहे. जिथे ग्राहकांना आरामात आणि स्वच्छ वातावरणात खरेदी करता येईल, अशी व्यवस्था आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र पाहिले तर अंगावर काटा येईल!

हीच इमारत आज प्रशासकीय नाकर्तेपणामुळे चक्क मुतारी बनली आहे. तर दुसरीकडे, ज्या मुख्य रस्त्यावरून वाहने सुसाट धावायला हवीत, तिथे भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शासकीय निधीचा धडधडीत अपव्यय कसा असावा, याचे हे ज्वलंत उदाहरण बीडच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com