Accident News : ज्या जीपवर केली "ड्रायव्हरकी" त्यातच घेतला अखेरचा श्वास,भोकरदन येथील घटना
Road Accident : भोकरदनमध्ये ३५ वर्षांहून अधिक काळ अपघातविना सेवा देणारे आणि अनेक वाहनचालक घडवणारे नारायण इंगळे यांचे निधन झाले. विशेष म्हणजे त्यांनी गेल्या १५ वर्षांपासून चालवत असलेल्या जीपमध्येच अखेरचा श्वास घेतला.
भोकरदन : रस्ते अपघात ;त्यात होणारे वाहनाचे नुकसान व बऱ्याचदा वाहन चालक मृत्युमुखी पडतात हे चित्र दररोज बघायला मिळते ,मात्र भोकरदन येथील पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ विना अपघात सेवा देणाऱ्या एका वाहन चालकाचे शनिवारी (ता.१०) रात्री आकस्मिक निधन झाले.