esakal | व्हिडीओ : पेरणीसाठी पती-पत्नीने ओढले सरते !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोणतेही कारण असो, दुःख आपल्याच माथी...पण खचून कस चालायच सखे, शेवटी आपनच आपले साथी!, असे म्हणते वालूर (ता.सेलू, जि. परभणी) येथील शेतकरी सय्यद मेहबूब सय्यद अली यांनी बैलजोडी नसल्याने स्वतःसह पत्नीने सरते ओढून पेरणी केली. आता याच पध्दतीने वेळेवर रासायनिक खताची मात्रा देण्याचे धाडस केले आहे.

व्हिडीओ : पेरणीसाठी पती-पत्नीने ओढले सरते !

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर (जि. परभणी)  : अर्थिक अडचणीमुळे बैलजोडी घेऊन सांभाळणे कठीण, त्यात मुलाचा दवाखान्याच्या खर्चासाठी तीन वर्षे शेती ठोक्याने लावली. या वर्षी शेती कसण्यासाठी बैलजोडी नाही. परंतु, काही केल्या शेतीतून उत्पन्न काढून संसाराचा गाडा हाकायचा, असा निश्चय बाळगून असलेल्या शेतकरी सय्यद मेहबूब सय्यद अली यांनी स्वतःसह पत्नीने सरते ओढून कापूस पिकाला वेळेवर रासायनिक खताची मात्रा देण्याचे धाडस केले.


वालूर (ता. सेलू, जि.परभणी) गावातील सय्यद मेहबूब सय्यद अली यांना शेत सर्वे क्रमांक-३१५ / अ मध्ये जवळपास साडेसहा एकर शेतजमीन आहे. त्यांच्या बावीसवर्षीय मुलास ब्रेन ट्युमरचा आजार झाला. शिर्डी येथील रुग्णालयात मुलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, शस्त्रक्रियानंतर मुलाच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. दोन्ही डोळ्यांनी अंपगत्व आले. शासकीय कोणतीही योजना मिळाली नाही.

सरते ओढून  उरकली पेरणी
 दैनंदिन व दवाखान्याचा खर्च करून अर्थिक अडचणीचा सामना करीत असताना बिकट परिस्थितीत निसर्गाच्या भरवशावर शेतीवर उदरनिर्वाह करीत असलेल्या सय्यद मेहबूब यांनी शेतीची कास सोडली नाही. साडेसहा एकर शेत जमीनत सहा बॅग कापूस, एक बॅग सोयाबीनसह  मुगाची स्वतःसह पत्नीने बैलजोडी उपलब्ध होत नसल्याने सरते ओढून पेरणी उरकली. 


हेही वाचा व पहा :​ Video: युवक काँग्रेसची परभणीत पेट्रोलपंपासमोर निदर्शने
 

खताची दिली मात्रा
वेळेवर पडलेल्या पावसामुळे पिके जोमदार आली. कापूस पिकास रासायनिक खताची मात्रा वेळेवर देण्यासाठीही सरते ओढून खत पेरणीसाठी पत्नीच्या सहकार्याने कापूस पिकाला रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी सुरवात केली. त्यांनी जवळपास सहा बॅग कापसाला रासायनिक खताची मात्रा दिली.

loading image
go to top