
परभणीच्या क्रांती चौकात असलेल्या हुतात्मा स्तंभाची नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनानिमित्त रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. यंदा अभिवादनाच्या विस्तारीत कार्यक्रमास कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.
परभणी ः शहरातील क्रांती चौकातील हुतात्मा स्तंभाची सध्या रंगरंगोटी सुरु करण्यात आली आहे. येत्या नऊ ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणारा क्रांती दिन व १७ सप्टेंबर रोजी साजरा होणारा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्य या स्तंभाची देखभाल दुरुस्ती सुरु आहे.
ता.१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून बाहेर पडला आणि आपण स्वतंत्र झालो. हे सर्वांनाच माहिती आहे. परंतू, त्यानंतरही मराठवाड्याची पावन भूमी निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाला असला तरी, मराठवाड्यातील जनता मात्र निजामशाहीत होरपळ होती. या निजामशाहीला विरोध करत मराठवाडा मुक्त करण्यासाठी, या भूमीतील हजारो विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
हेही वाचाच - Corona Breaking ; परभणीत पाचजणांचा मृत्यू, ५४ रुग्ण वाढले
ज्या जागेवर मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्रवीरांचे रक्त सांडले ती जागा म्हणजे परभणीतील क्रांती चौक होय. याच कारणामुळे क्रांती चौकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. ता.१७ सप्टेंबर १९४८ साली मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला आणि मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्याच्या स्वच्छ आणि पवित्र वातावरणात मोकळा स्वास घेतला. याच दिनाचे महत्व पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरावे. यासाठी परभणी शहरातील क्रांतीचौक परिसरात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. या हुतात्मा स्तंभाच्या जागेवर वर्षातून दोन उत्सव साजरे करून हुतात्म्यांना आदराजंली वाहण्यात येत असते.
हेही वाचा - युवकांचा हात प्रशासनाच्या मदतीला... परभणीतील उपक्रम
बाकड्यांना रंग देण्याचे काम सुरु
ता.नऊ ऑगस्ट आणि १७ सप्टेंबर या दोन दिवसात महापालिका आणि हुतात्मा चॅरिटेबल ट्र्स्टच्यावतीने हे कार्यक्रम घेतले जातात. नऊ ऑगस्ट ही तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे हुतात्मा स्तंभाच्या परिसराचे सुशोभिकरण केले जात आहे. या ठिकाणी नागरिकांना बसता यावे यासाठी लावण्यात आलेल्या बाकड्यांना रंग देण्याचे काम सुरु आहे. स्तंभाशेजारील शोभिवंत झाडांची देखभाल केली जात आहे. कोरोना विषाणु संसर्गामुळे यंदा अभिवादनाच्या विस्तारीत कार्यक्रमास ब्रेक लागला असला तरी, दिवसाचे महत्व कायम ठेवण्यासाठी हा परिसर सुशोभित केला जात आहे.
हे देखील वाचाच - हिंगोली : काळ्या बाजारात जाणारा ११२ क्विंटल धान्य साठा जप्त
बाकड्यावर म्हणीच्या माध्यमातून जनजागृती
हुतात्मा स्तंभाच्या सभोवताली नागरिकांना बसण्यासाठी बाकडे लावण्यात आले आहेत. केवळ या ठिकाणी बसून केवळ मनोरंजनच नाही तर नागरिकांची जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक बाकावर म्हणी लिहण्यात येत आहेत. या म्हणीच्या माध्यमातून संस्काराची पेरणी देखील करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे.
कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
क्रांती हुतात्मा प्रतिष्ठाण व परभणी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वर्षातून दोनवेळा या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेत असतो. यंदा कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले असले तरी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, महापौर, आयुक्त तसेच इतर मान्यवरांना या ठिकाणी अभिवादनासाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्याची तयारी सुरु आहे.
- बालनाथ देशपांडे, अध्यक्ष क्रांती हुतात्मा प्रतिष्ठाण.
संपादन ः राजन मंगरुळकर