Video ; नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

chintamani
chintamani

हिंगोली ः कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या निर्देशांचे पालन करीत शहरातील नवसाला पावणारा जागृत चिंतामणी गणपती मंदिरात अगदी साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोजक्याच लोकात सर्व नियम पाळून आरती देखील घेण्यात आली.

भाविकांना मंदिराकडे जाता येऊ नये याकरिता पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात लाकडी बांबूच्या सहाय्याने ब्यारिकेटिंग देखील करण्यात आली आहे. कोरोनामुळे संस्थांकडून यावर्षी वार्षिक उत्सव रद्द करण्यात आला आहे.

जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे शनिवारी (ता.२२) उत्साहात घरोघरी स्वागत करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कुठेही बँड, ढोल ताशा व मिरवणूक न काढता गणेशाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले सूचनांचे पालन 
कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी गणेशोत्सवापुर्वी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या वेळी त्यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा गणेशाचे आगमन व विसर्जन निमित्ताने कुठेही सार्वजनिक मिरवणूक काढू नये, सामाजिक मंडप उभारु नये अशा विविध सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे पालन करत साधेपणाने लाडक्या बाप्पाची विधिवत पूजा करून स्थापना केली. बाजारात गणेशमूर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती.

औढा नागनाथ येथे घरोघरी गणेशाची स्थापना
औंढा नागनाथः येथे लाडक्या बाप्पाचे  घरोघरी आगमन झाले. गणपती बाप्पा मुर्ती कुणी मोटरसायकलवर तर कोणीही ऑटोमध्ये तर कोणी हातामध्ये घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेवुन जात होते. घरी गणपतीची मूर्ती स्थापना करून आरती व मोदक महाप्रसादाचे वाटप केले गेले. घरोघरी गणपतीची स्थापना करून मनोभावे पूजा केली तसेच या देशावरील कोरोनाचे संकट जाऊदे अशी ही गणेशभक्तांनी गणरायाकडे साकडे घातले.

संपादन ः राजन मंगरुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com