

Second sugarcane fire in a week hits Vihamandwa farmers.
Sakal
अनिल गाभुड
विहामांडवा : विहामांडवा शिवारात विद्युत वाहिनी तुटून ऊसाच्या शेतात पडल्याने लागलेल्या आगीत साडेनऊ एकर तोडणीयोग्य ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत पाच शेतकऱ्यांचा ऊस, ठिबक सिंचन संच, पाइप व इतर शेती साहित्य जळून सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरातच याच शिवारात ऊस जळीताची दुसरी घटना घडल्याने शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.