फुलंब्री - शहरातील महात्मा फुले क्रीडा मंडळाचे चालक विजय देवमाळी हे वीस वर्षांपासून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना त्यांच्या या कार्यामुळे जीवनदान मिळाले असून रात्री बेरात्री होणाऱ्या अपघातात रुग्णांना तत्काळ रुग्णवाहिकेव्दारे मदत करणाऱ्या या अवलियाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.