
गेवराई : आमदारकीची पहिलीच टर्म असलेल्या बीडमधील गेवराईचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी विशेष अधिवेशनात हटके शपथ घेतल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभागृहात गेवराई मतदारसंघातील सिंचन, महामार्गाची दुरावस्था,मुख्यमंत्री यूवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणी आवाज उठवून चुणूक दाखवली.