

Political Drama in Kej
esakal
बीड, ता. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री फोन करून संवाद साधल्यानंतर कदमवाडी (ता. केज) येथील ‘हॉटेल गावकरी’चे मालक विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी नातेवाईक व ग्रामस्थांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन सुमारे ५३ तासांनी मागे घेतले. हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेता केज पोलिस ठाण्याच्या आवारात आणि रस्त्यावर हे ठिय्या आंदोलन सुरू होते.