शेवडी जहांगिर येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला

किशन बारहाते
गुरुवार, 18 एप्रिल 2019

मानवत : मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थामध्ये वाद उदभवला. ग्रामस्थांनी पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करून पोलिसांची गाडी फोडली. यात गाडी चालक जखमी झाला आहे. ही घटना शेवडी जहागिंर (ता.मानवत) येथे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या मतदान केंद्रावर अर्धातास मतदान बंद करण्यात आले होते.

मानवत तालुक्यातील शेवडी जहांगिर या गावातील मतदान केंद्रावर सकाळी साडे नऊ वाजता मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत ग्रामस्थ आले होते. पोलिसांनी या ग्रामस्थांना तेथून जाण्यास सांगितले. परंतू ग्रामस्थ जात नसल्याने गस्तीसाठी आलेल्या पोलिसांनी या ग्रामस्थांना सिमारेषे बाहेर काढले. यामुळे पोलिस व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तातडीने परिस्थितीत आटोक्यात आणली. या मतदान केंद्रावर अर्धातास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. सध्या  या ठिकाणी संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Web Title: villagers attacks on police at shewadi jahangir nanded