
धनंजय शेटे
भूम . रस्ता होण्यासाठी भूम तालुक्यातील अंतरगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यामध्येच पाच फूट खड्डा खोदून त्यात स्वतःला कमरेपर्यंत मातीमध्ये बुजून घेऊन आंदोलन चालू केले आहे .तालुक्यातील अंतरगाव येथील समस्त ग्रामस्थांनी पाथरूड रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करण्याची मागणी निवेदनामध्ये दिली आहे.