Beed News : गावातील फलकावर काम झाल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र अपूर्णच ग्रामस्थांची तक्रार

Beed Latest News : कोरडेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी ३५ लाख ४५ हजार रुपये खर्चाच्या निधीतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असून झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
villagers claim that work has been done on board but in reality it is incomplete beed
villagers claim that work has been done on board but in reality it is incomplete beedSakal
Updated on

केज : कोरडेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी ३५ लाख ४५ हजार रुपये खर्चाच्या निधीतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असून झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. केवळ विहीर व पाइपलाइनचे काम केले आहे.

परंतू हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चार एप्रिल- २०२४ रोजी काम पूर्ण झाल्याचा फलक लावला असल्याची तक्रार मंगळवारी (ता.१६) ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोरडेवाडी येथे जल जीवन योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे अपूर्ण आहेत. सद्यस्थितीत गावातील नळांना पाणी आले नसताना संबंधित कंत्राटदाराने चार फेब्रुवारी २०२४ रोजी काम पूर्ण झाल्याचा फलक पाण्याच्या टाकीजवळ लावला. त्या फलकावर झालेली कामे व त्यासाठी झालेला खर्च नोंदवण्यात आला आहे.

परंतू नोंद केलेल्या कामापैकी जुनी विहीर खोलीकरणची दोन कामे आणि त्यासाठी प्रत्येकी २ लाख ९१ हजार रुपये व २ लाख ७० हजार रुपये, पंप घरासाठी २ लाख १५ हजार रुपये, पंपिंग मशिनरीसाठी ६ लाख ४३ हजार रुपये, गुराढोरांसाठी पाण्याचे दोन हौद बांधण्यासाठी ४ लाख ७९ हजार रुपये,

निर्जंतुकीकरण व्यवस्थापनसाठी २० हजार रुपये, योजना चाचणीसाठी ७८ हजार रुपये, बोअरसाठी १ लाख ४० हजार रुपये, विद्युत कनेक्शनसाठी ५० हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. यातून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचेही ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केले आहे.

उपोषणाचा इशारा

प्रत्यक्षात जल जीवनची कामे झाली नसल्याची तक्रार ग्रामपंचायतीने केली आहे. या कामाची चौकशी व तपासणी पूर्ण करून संबंधित कंत्राटदारास बिल अदा करण्यात आले असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

या प्रकरणी उच्चीत कारवाई करण्यात न आल्यास कोरडेवाडी ग्रामस्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंच श्रीमती नंदुबाई रमेश कोरडे, हनुमंत शाहू कोरडे, जयपाल रामकृष्ण यादव, शिवाजी विठ्ठल कोरडे, संतोष प्रल्हाद यादव, भारत नामदेव निकम यांनी दिला आहे.

विहिरीचे खोदकाम, जलवाहिनी अपूर्ण

कोरडेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश ४ जानेवारी २०२३ रोजी मुंबईच्या नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या एजन्सीस दिले होते. या एजन्सीने गावात विहिरीचे खोदकाम व जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com