

बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करावी, सहभागी असलेल्यांना सहआरोपी करावे, या घटनेला कारणीभूत असलेले केजचे तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, निलंबीत फौजदार राजेश पाटील यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या बैठकीत झाली.