हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत

bothi
bothi
Updated on

आखाडा बाळापूर( हिंगोली) : बोथी (ता. कळमनुरी) सह इतर चार गावांमध्ये गुरुवारी (ता.२७) पहाटे साडेतीन वाजता जमिनीतून मोठा आवाज झाला. मोठा आवाज आल्याने गावकऱ्यांनी मोकळ्या जागेवर आश्रय घेतला. या आवाजामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भूकंप झाल्याची चर्चा रंगत होती. 

कळमनुरी तालुक्यातील बोथी, पावनमारी, देववाडी, कुंभारवाडी भागात गुरुवारी पहाटे जमिनीतून मोठा आवाज आला. सुमारे पाच ते सहा सेकंद आवाज होता. त्यामुळे भूकंप होत असल्याचा भास झाल्याने गावकरी घराबाहेर पळाले. त्यानंतर मोकळ्या जागेचा आश्रय घेतला. या आवाजामुळे टीनपत्र्याचे आवाज झाले, खिडक्यांची तावदानेदेखील हालत होती. गावात भूकंप झाल्याची माहिती गावकऱ्यांनी महसूल विभागाला दिली. 

अफवांचे पेव फुटले

तसेच नातेवाइकांना याची माहिती दिली जाऊ लागली. सकाळी सात वाजल्यानंतर गावकरी आपापल्या घरात परतले. या आवाजाची भीती गावकऱ्यांमध्ये कायम असून मागील अनेक वर्षांनंतर प्रथमच येथे मोठा आवाज ऐकण्यास मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पहाटेपासूनच दूरध्वनी खणखणू लागले. गावात भूकंप झाल्याची माहिती बाहेरगावी दिली जाऊ लागली. त्यामुळे अफवांचे पेव फुटले. सकाळी मात्र सर्व गावामध्ये गावकऱ्यांनी पाहणी केली. यामध्ये कुठेही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

ग्रामस्थांना दिला दिलासा 

दरम्यान, भूकंप झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलिस निरीक्षक विकास थोरात, तलाठी, मंडळ अधिकारी आर. व्ही. सावंत आदी महसूल कर्मचाऱ्यांनी बोथी गावाकडे धाव घेतली. गावातील आदिवासी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत गावकऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्थांना दिलासा दिला. दरम्यान, आपत्ती विभागातर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 

यापूर्वीही गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत

पांगरा शिंदे, सिरळी, वापटी, कुपटी, पिंपळदी, राजदरी, हरवाडी आदी गावांत यापूर्वी गूढ आवाज झाले आहेत. प्रशासनातर्फे गावकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाते. मात्र, हे गूढ आवाज कशामुळे होत आहेत. याची ठोस माहिती ग्रामस्थाना मिळत नाही. बोथी येथे जमीन हादरल्याचे गावकरी सांगत आहेत. मात्र, हा नेमका भूकंपच होता का, याची माहिती मात्र समजू शकली नाही. दरम्यान, बोथी येथे बुधवारी रात्री गावी मुक्कामी होतो. गुरुवारी पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान जमीन हादरल्याचे कृषी विभागाचे मंडळ अधिकारी के. एच. बोथीकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com