Maratha Reservation : खोडेगावच्या ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या, सदावर्तेसह राणे, कदम यांची काढली अंत्ययात्रा

शासनाने लवकरात लवकर लगेच ओबीसी तुन मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी खोडेगाव येथील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी केली
villagers of khodegaon funeral procession of Gunaratna Sadavarte  narayan rane ramdas kadam spoke against Maratha reservation
villagers of khodegaon funeral procession of Gunaratna Sadavarte narayan rane ramdas kadam spoke against Maratha reservationSakal

चिते पिंपळगाव : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून खोडेगाव (ता .जि छत्रपती संभाजीनगर) येथे मराठा समाज बांधवांनी व गावातील सर्वधर्मीय गावकऱ्यांनी नेहमी मराठा समाजाच्या व आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते ,व मराठा कुणबी या विरोधात वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम,

या तिघांचीही गुरूवार ता.26 रोजी सकाळी दहा वाजता गावात अंत्ययात्रा काढुन या तिघांचाही मराठा समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी निषेध केला असून , त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत , मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर , शासनाने उपोषणाची वेळ येऊ देऊ नये,

शासनाने लवकरात लवकर लगेच ओबीसी तुन मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी खोडेगाव येथील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे , विशेष म्हणजे या अंत्ययात्रेला मडके घेऊन मुस्लिम युवक व गावातील ओबीसी , मुस्लिम ,दलित बांधव मोठ्या प्रमाणावर सामिल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com