नांदेड : शासकिय रुग्णालयातील पर्यवेक्षकावर विनयभंगाचा गुन्हा

प्रल्हाद कांबळे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

येथील शासकिय रुग्णालयातील सुरक्षा बलाचे पर्येवेक्षक याच्या त्रासाला कंटाळून एका महिला सुरक्षा रक्षकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पर्यवेक्षकावर विनयभंग गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेड : येथील शासकिय रुग्णालयातील सुरक्षा बलाचे पर्येवेक्षक याच्या त्रासाला कंटाळून एका महिला सुरक्षा रक्षकाने विष पिऊन शनिवारी (ता. १४) सकाळी सात वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पर्यवेक्षकावर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा रात्री ११ वाजता ग्रामिण पोलिस ठाण्यात दाखल झाला. सदर महिला कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. 

विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कार्यरत आहेत. पंरतु मागील काही दिवसांपासून त्यांच्या सेवेवर रुग्णालयातील रुग्ण व नातवाईकांसह रुग्णालयीन कर्मचारीही त्रस्त आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला वाईट वागणूक या कर्मचाऱ्यांकडून मिळत असते. यावर कहर म्हणजे त्यांचे पर्यवेक्षक पी. आर. उबाळे हे महिला सुरक्षा रक्षकांना नेहमीच अपमानीत करतात. त्यांना अश्लिल व जातीवाचक शिविगाळ करतात. एवढेच नाही तर त्यांनी चक्क शनिवारी (ता. १४) सकाळी सातच्या सुमारास एका महिलेचा विनयभंग केला. या सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेनी विषारीआैषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना दुसऱ्याही महिलेला विषबाधा झाली.

दरम्यान, सध्य़ा या दोन्ही महिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात पी. के. उबाळे याच्याविरूद्ध  विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of offense against a supervisor at a government hospital in Nanded