
कळंब (जि.धाराशिव) : तालुक्यातील मोहा येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणावरून काही जणांनी दगडफेक तसेच गोफणीद्वारे दगडांचा मारा केला. यात पाच पोलिसांसह अनेक ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता.२६) घडली. दरम्यान, गावात तणावामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.