केज - अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरूणाची दुचाकी अडवून शेतात नेऊन झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.२६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर या मारहाणीचा मुख्य सुत्रधार फरार आहे.