

जालना : कौटुंबिक वादातून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी (ता. दहा) दुपारी दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. दगडफेकीत खासगी रुग्णवाहिकेचे नुकसान झाले असून, परिसरात विटा, दगडांचा खच पडला होता. या राड्यादरम्यान पोलिसांनी एक चाकूही जप्त केला आहे.