

Vishnupuri Dam
esakal
लोहा - विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व पशुधनासाठी कालव्याद्वारे तीन पाणीपाळ्या सोडून एकूण 10 दलघमी पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच नांदेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या प्रस्तावित 35 दलघमी पाण्याऐवजी दुप्पट म्हणजे 70 दलघमी पाणी आरक्षित ठेवावे, या न्याय्य मागण्यांसाठी रविवार,(ता. 29 ) सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत काळेश्वर घाट, विष्णुपुरी येथे शांततापूर्ण, संविधानिक व कायदेशीर प्रतीकात्मक जलसत्याग्रह करण्यात येणार आहे.