esakal | पूर्णा तालुक्यात केंद्रीय आरोग्य पथकाची भेट

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

पूर्णा तालुक्यात केंद्रीय आरोग्य पथकाची भेट

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा ( जिल्हा परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालय व कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु पाहत असलेल्या रुपला (ता. पूर्णा ) येथे केंद्रीय आरोग्य पथकाने भेट देवून आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेतला.
        
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुपला या गावात तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १० ) केंद्रीय आरोग्य पथकाने या गावाला भेट दिली व त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मार्गदर्शक सुचना केल्या. ग्रामीण भागातील वाढत्या संख्येची आरोग्य यंत्रणेने दखल घेत उपाय योजना राबविल्या जाणार आहेत. शनिवारी केंद्रीय आरोग्य पथकातील डॉ. दिनेश बाबू, प्रा. डॉ. रंजना सोळंकी यांनी गावातील स्थितीचा आढावा घेत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसीलदार पल्लवी टेमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, तालुका अधिकारी डॉ. संदीप काळे, चंद्रकांत काकडे, माधव आवरगंड आदी उपस्थित होते. त्या नंतर त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालय, शहरातील कोविड केअर सेंटर, माटेगाव आरोग्य उपकेंद्र येथे भेट दिली व पहाणी केली. खबरदारी म्हणून रुपला गावातील २०० नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - 'कोरोना योध्दा विद्यापीठ' नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे जाणवल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांनी केले आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा ज्या गावात रुग्णसंख्या वाढत आहे त्या गावावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे