visit to temple of Kedareshwar gives wonderful architectural experience beedSakal
मराठवाडा
Kedareshwar Temple : केदारेश्वराच्या मंदिरात दर्शनासह मिळतो अद्भुत स्थापत्यशैलीचा अनुभव
Beed latest news | धर्मापुरी येथे १२ व्या शतकात स्थापलेल्या शिवालयात भाविकांसह अभ्यासकांचीही लागते रीघ
बीड : धर्मापुरी (ता.परळी) येथील १२ व्या शतकातील केदारेश्वर मंदिरात भाविकांना महादेवाचे दर्शन घडतेच. शिवाय याठिकाणी चालुक्य शैलीतील अनोख्या शिल्पकलेचेही दर्शन घडते. चालुक्य राजा विक्रमादित्य-सहावा (इ.स.१०७६ ते ११२६) यांनी या मंदिराची निर्मिती केलेली असून श्रावण महिन्यात याठिकाणी पंचक्रोशीतून भाविक दर्शनास गर्दी करतात. यासह पुरातन स्थापत्यशैलीचे राज्यभरातील अभ्यासकही याठिकाणी असलेल्या शिल्पांची पाहणी करण्यास येतात.