
लातूर : आयोगाच्या आदेशानुसार ता. एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ता.३० ऑगस्ट २०२४ रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व दोन हजार १४२ मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.