esakal | हिंगोलीतील पोलिस पेट्रोलपंपाची प्रतीक्षा वीस वर्षानंतर संपली
sakal

बोलून बातमी शोधा

pppp

हिंगोलीत जिल्हा पोलिस कल्याण निधीअंतर्गत पोलिस पेट्रोल पंपाचे उद्‍घाटन गुरुवारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

हिंगोलीतील पोलिस पेट्रोलपंपाची प्रतीक्षा वीस वर्षानंतर संपली

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली: आपल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा विश्वासघात होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पेट्रोलपंपाच्या उद्‍घाटनप्रसंगी पोलिस प्रशासनाला दिल्या. मागील २० वर्षांपासून हिंगोली येथे पेट्रोलपंप उभारण्यासाठी हिंगोलीचे पोलिस प्रशासन प्रयत्नशील होते. जागादेखील निश्चित झाली होती; मात्र अडीच वर्षांपासून पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी याचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली होती अन् ती प्रतीक्षा आज पूर्णपणे संपली. 
 

ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा पोलिस कल्याण निधीअंतर्गत पोलिस पेट्रोलपंपाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता.२४) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, गणेश वाघ आदींची उपस्थिती होती. 

पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांचा पाठपुरावा 
या वेळी निसार तांबोळी म्हणाले, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेल्यानंतर पेट्रोल कमी आले, कमी टाकले अशा एक ना अनेक तक्रारी तोंडातून आपसूकच पुटपुटतात. मात्र, आता हे पूर्ण थांबण्यास मदत होणार असून, गेल्या वीस वर्षांपासून असलेली प्रतीक्षा आज संपली आहे. आपल्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस प्रशासनाचे एक प्रकारे ऋण फेडण्याची संधी या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यावर मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील २० वर्षांपासून हिंगोली येथे पेट्रोलपंप उभारण्यासाठी हिंगोलीचे पोलिस प्रशासन प्रयत्नशील होते. जागादेखील निश्चित झाली होती; मात्र अडीच वर्षांपासून पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी याचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली होती अन् ती प्रतीक्षा आज पूर्णपणे संपली. 


हेही वाचा - हिंगोली : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन विविध स्पर्धा

दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
हिंगोली जिल्हा पोलिस कल्याण निधीअंतर्गत अखेर पेट्रोलपंप उभारला असून, या पंपावरील जो काही नफा असेल तो पोलिस प्रशासनात राबत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खर्च केला जाणार आहे. तसेच या पेट्रोलपंपाची व डिझेलची विश्वासार्हता ग्राहकांसाठी कायम राहावी म्हणून, येथे पेट्रोलच्या रीडिंग व सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनात टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक थेंबाची या ठिकाणी नोंद राहणार आहे. त्यामुळे पेट्रोल चोरी, वगैरे अशा सर्वच तक्रारीतून मुक्तता होणार आहे. तर यासाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, या पंपाचे सर्व नियोजन हे पोलिस प्रशासनाचे राहणार असून, येथील लहान सहान हालचालींवर लक्ष देखील राहणार आहे. 

हेही वाचा - हिंगोलीत खळबळ : पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

निधी उपयोगात आणला जाणार 
इंडियन ऑईल कंपनीचा हा पेट्रोलपंप असून, पोलिस प्रशासनाचा असला तरी तो सर्वांसाठी राहणार आहे. या ठिकाणी ग्राहकांसाठी योग्य त्या सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. पोलिस प्रशासनातील परभणी अन् दुसरा हिंगोली येथे पोलिस दलात पेट्रोलपंप असल्याचे कंपनीच्या वतीने सांगितले. तर एखादा पोलिस कर्मचारी, महिला कर्मचारी आजारी किंवा कर्मचाऱ्याच्या पाल्यास भविष्यात हा निधी उपयोगात आणला जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. 

संपादन ः राजन मंगरुळकर