
इटकळ (जि. धाराशिव) : येथून जवळच असलेल्या बाभळगाव (इटकळ) येथे मजुरांच्या अंगावर भिंत कोसळून एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (ता. २०) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रोहित मनजितसिंग हजारे (वय २८) असे मृत मजुराचे नावा आहे. तर बाळासाहेब घाडगे (रा. कागल) जखमी आहे. त्याच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.