
बीड/केज : अवादा कंपनीच्या मस्साजोग (ता. केज) येथील पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पण सध्या कोठडीतील वाल्मीक कराडवर अखेर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याच्या (मकोका) कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.