Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड यानेच केले मार्गदर्शन; सरपंच हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांनी मांडला घटनाक्रम
Ujjwal Nikam : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याने मार्गदर्शन केल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. उज्ज्वल निकम यांनी परिस्थितिजन्य आणि डिजिटल पुरावे सादर केले.
बीड : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम आठ ऑक्टोबरला परळीतील जगमित्र कार्यालयातून सुरू झाला. नऊ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या झाली.