
Parli, Beed Crime: महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांची नावे समोर आल्यानंतरही त्यांना पोलिसांकडून अटक केली जात नाही. महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी वाल्मीक कराडने संपविला. त्याला आकस्मिक मृत्यूचे स्वरूप देण्यात आले. यातील गोट्या गित्ते हा सायको किलर असून तो फरारी आहे. त्याच्यापासून सर्वांनाच धोका असल्याचा आरोपही विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी गुरुवारी (ता. १७) केला.