
थोडक्यात...
सुरेश धस यांनी महादेव मुंडेंची हत्या केवळ १२ गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली असल्याचे स्पष्ट केले, ज्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे.
१८ महिन्यांत ८ वेळा तपास अधिकारी बदलले गेल्याने आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करेपर्यंत कारवाई न झाल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरेश धस यांनी बीड पोलीस दलातील अधिकारी गुंड टोळीला मदत करत असल्याचा आणि एसपी खालच्या अधिकाऱ्यांचे ऐकून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Mahadev Munde Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातले गुन्हेगारीचे अनेक प्रकरणं मागच्या काळात बाहेर आले. धनंजय मुंडेंचा उजवा हात असेलला वाल्मिक कराड हा अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याचं निष्पन्न होत आहे. महादेव मुंडेंच्या खुनातही वाल्मिकचाच हात असल्याचा थेट आरोप अनेकांनी केलाय.