
Parli, Beed Crime: गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो. बीडच्या परळीतलं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. दावा केला जातोय की, वाल्मिक कराडचा राईट हँड असलेला गोट्या गित्ते याच्या सख्ख्या भावाने एक म्हैस चोरी केली. या सीसीटीव्ही फुटेजवरुन सोमनाथ गित्तेवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.