
Beed Crime News: सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या, अवादा कंपनीला खंडणी प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड याला मकोकातून (महाराष्ट्र नियंत्रण गुन्हेगारी संघटन कायदा) दोषमुक्त करावे, या मागणीवर मंगळवारी (ता. तीन) सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम व विशेष सहाय्यक सरकारी वकिल अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी म्हणणे सादर केले. आरोपी पक्षाकडून झालेल्या डिजीटल पुराव्यांच्या मागणीवर बंद लखोट्यात पुरावे न्यायालयाला देणार असल्याचेही सरकार पक्षाकडून सांगण्यात आले. आजच्या सुनावणीत कुठलेही युक्तीवाद झाले नाहीत. केवळ एकमेकांच्या अर्जांवर दोन्ही पक्षांनी म्हणणे मांडले.