
जितेंद्र आव्हाडांनी गौप्यस्फोट केला की, वाल्मिक कराडवरील 'मकोका' देशमुख कुटुंबीयांच्या दबावामुळे आणि बातमी फुटल्यामुळे कायम राहिला, अन्यथा तो रद्द होणार होता.
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचे नाव पुढे येत असून, बाळा बांगर यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण मकोकातील आरोपी कोर्टात येऊनही त्यांना पत्ता लागत नाही आणि महादेव मुंडे खून प्रकरणी कारवाई होत नाही.
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर सातही आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई झालेली आहे. परंतु त्याच्यावरचा मकोकाचा चार्ज रद्द करण्यात येणार होता, तशी खेळी झाली होती.. असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.