बीड - तीन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी जिल्हा रुग्णालयातून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी (ता. २२) मध्यरात्री त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात शरिक करण्यात आले होते..आवादा कंपनीच्या मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाला धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मगितल्यावरून वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर मकोकानुसार गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या रपकरणाचा कट रचल्याचाही त्याच्यावर ठपका आहे..दरम्यान, ता. १५ जानेवारी पासून २२ जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला विशेष मोक्का न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सूनवल्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी झाली. बुधवारी रात्री पोटदुखीच्या त्रासाची तक्रार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुरुवातीला कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली..पुन्हा मध्यरात्री त्याला जिल्हा रुग्णालयात शरिक करण्यात आले. शल्यचिकीत्सा विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या विविध चाचण्याही करण्यात आल्या. शनिवारी (ता. २५) रात्री शल्यचिकीत्सा विभागाच्या तज्ज्ञांची त्याची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती सुधारल्याचा अहवाल जिल्हा कारागृह रपशासनाला दिला. त्यानंतर त्याची सिव्हीलमधून कारागृहात रवानगी करण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.