
Mahadev Munde Case: महादेव मुंडे खून प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख खून प्रकरणात जेलमध्ये आहे. महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात वाल्मिकचा धाकटा मुलगा सहभागी असल्याचा आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप राजकीय आहेत, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि वेगाने सूत्र फिरली.