
बीड : ‘आपण दोघेही जेलमध्ये असल्यामुळे तू वाचलास. बाहेर असतास तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते’, अशी धमकी वाल्मीक कराडचा साथीदार सुदर्शन घुले याने महादेव गित्तेला दिल्याचा दावा त्याची पत्नी मीरा गित्ते यांनी केला. तुरुंगातही वाल्मीक कराडची दशहत असल्याचा आरोप त्यांनी केला.