
बीड - अवादा कंपनीच्या मस्साजोग (ता. केज) येथील प्रकल्पाला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात २१ दिवस फरार असलेला वाल्मिक कराड या काळात पुण्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात धार्मिक पर्यटन करत होता, अशी माहिती समोर येत आहे.