Walmik Karad : वाल्मीकची ‘माया’ सीआयडीच्या दफ्तरी; कागदपत्रांची जुळवणी करत जप्तीची प्रक्रिया सुरू
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा एकेकाळी मुंडेंचा विश्वासू होता. त्याच्या अचानक झालेल्या संपत्तीवाढीवर सीआयडीची नजर आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड एकेकाळी मुंडेंचा घरगडी होता. मागच्या काही वर्षांत त्याच्या संपत्तीची गगनभरारी सर्वश्रुत होती. पण, आता त्याची ही माया गुन्हे अन्वेषण विभागाच्या कागदपत्रांत देखील नोंदली गेली आहे.