भूम : तालुक्यातील वालवड टँकरमुक्त झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटल्यामुळे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. मैनांक घोष यांनी नुकतीच वालवडला भेट देत पाहणी केली..भूम तालुक्यातील वालवडची धाराशिव जिल्ह्यातील बारमाही टँकरचे गाव म्हणून ओळख आहे. गतवर्षी रोज चार टँकरने १० खेपाद्वारे गावात पाणीपुरवठा करण्यात आला होता. जवळपास पाच हजार लोकसंख्या आणि सात वसाहती असणारे वालवड सर्कलचे मोठे गाव आहे. मात्र, पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्यामुळे गाव कायम टँकरवर अवलंबून होते..परंतु, यावर्षी जल जीवन मिशन अंतर्गत जांब-मात्रेवाडी साठवण तलावावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे वालवडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. गाव टँकरमुक्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष यांनी वालवडला भेट देत योजनेची पाहणी करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे अभिनंदन केले..दरम्यान, वालवड ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यारत्न योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तीन हजार रुपये, तर लेक लाडकी माझ्या गावची योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी सात हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याचे वाटप जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वालवड आठवडे बाजार विकसित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले..Nanded Infrastructure Issue : रस्त्यावरील पूल नव्हे, मृत्यूचा सापळा!.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयंत पाटील, गटविकास अधिकारी वग्गे, विस्तार अधिकारी गलांडे, ए.जी. बोईने, सरपंच प्रभावती देवळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण खताळ, सिद्धेश्वर सावंत, श्रीहरी बारस्कर, संदीप पाटील, अफजल पठाण, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद लवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.